वडीलांच्या नावावरील जमीन मुलाच्या नावावर करून देण्यासाठी लाच स्वीकारताना तलाठी जाळ्यात

रत्नागिरी:- वडिलांच्या नावावर असलेली जमीन वडिलांच्या मृत्युपत्रानुसार तक्रारदार यांच्या नावावर करून देण्यासाठी आणि तसा सातबारा उतारा देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठी याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

अक्षय शिवगोंडा पाटील, तलाठी सजा सुकुंडी ता. दापोली असे पकडलेल्या तलाठी याचे नाव आहे. त्याने तक्रारदार यांच्याकडे 10000
रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 7000 रुपये लाच रक्कम मौजे दापोली येथे पंचांसमक्ष स्वीकारली असता रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी तलाठी पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कारवाई चालु आहे.