रत्नागिरी:- रेल्वेस्टेशन येथे एका हॉटेलच्या बाजूला वडापावच्या गाडीवरुन अज्ञात चोरट्याने मोबाईल पळविला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. ६) पहाटे चारच्या सुमारास गणेश वडापाव सेंटर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेश प्रकाश सुर्वे (वय ५०, रा. मुळे वारपडवाडी, वरची निवेंडी, रत्नागिरी. सध्या रा. जय गणेश वडापाव सेन्टर, रेल्वेस्टेशन-रत्नागिरी) यांनी आपला मोबाइल वडापावच्या गाडीवर ठेवला असताना चोरट्याने तो पळविला. या प्रकरणी उमेश सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.









