Friday, June 12, 2026
spot_img
Home खेड लोटे एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती

लोटे एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती

नंदादीप केमिकलमध्ये घटना, सुदैवाने जीवितहानी टळली

खेड:- लोटे एमआयडीसी क्षेत्रातील नंदादीप केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये शुक्रवारी सकाळी गॅस गळतीची घटना घडली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास कंपनीत तांत्रिक कारणामुळे गॅसची गळती सुरू झाली.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या. वेळीच उपाययोजना केल्या गेल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि मोठा अपघात टळला.

लोटे एमआयडीसीमध्ये गॅस गळती किंवा आगीच्या घटना वारंवार घडत आहेत.यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये सातत्याने भीतीचे वातावरण असते.या सातत्यपूर्ण घटनांमुळे एमआयडीसी प्रशासनाच्या आणि संबंधित यंत्रणांच्या सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार घडणाऱ्या या दुर्घटना रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कडक नियमावली राबवावी आणि कंपन्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी आग्रही मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.