खेड:- तालुक्यातील लोटेमाळ येथील एका महिलेची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी उशिरा अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी सायं. ६.२० ते ६.२५ या कालावधीत घडली.
लोटेमाळ येथील श्री एंटरप्रायझेस् मनी ट्रान्स्फर कार्यालयात येऊन महिलेच्या कार्यालयातील एअरटेल मोबाईल नंबरच्या एअरटेल वॉलेट मनी अकौंटमधून एस बँकेच्या खात्यातून २५ हजार रूपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. मात्र, ती रक्कम महिलेच्या खात्यावर जमा न करता कार्यालयातून निघून जात त्याने फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.









