लॉकडाऊननंतर पुन्हा स्थिरावण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी उखडली पाळेमुळे

ओसवाल नगर सेक्स रॅकेट 

रत्नागिरी:- पोलीसंचा ससेमिरा चुकविण्यासाठी सेक्स रॅकेट चालविणारी टोळी अनेक वर्षे जिल्हे बदलून व्यवसाय करत असल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या पद्मिनबाई बादलवाड, शिवाजी पाटील या दोघांवर यापूर्वी ही वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडल्याचा गुन्हा दाखल आहे.लॉकडाउन नंतर ही जोडी पुन्हा रत्नागिरीत स्थिरावण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.             

टोळीतील महिला परजिल्हासह परराज्यातील तरुणींच्या संपर्कात आहे. जिल्हे बदलल्यानंतर ती तरुणीशी संपर्क साधून त्याना तेथे बोलवत असे. व्यवसाय करण्यासाठी हाय प्रोफाइल भागाची निवड ते करत होते. चार चाकी आलिशान गाडीतून दोघे फिरत असल्याने त्यांच्या वर कोणीही संशय घेत नव्हते. त्या भागात ओळख वाढताच काही महिने ते आपले बस्तान अन्य जिल्ह्यात हलवत होते. त्यामुळे ही टोळी अनेक वेळा पोलिसांच्या नजरेतून सुटत होती. परंतू रत्नागिरी पोलिसांनी अखेर त्या टोळीला जेरबंद केले आहे.