लेखी परीक्षेचे तात्पुरते गुणपत्रक संकेतस्थळावर

पोलिस शिपाई बॅण्ड्समन; आक्षेप, हरकती नोंदविण्याचे आवाहन

रत्नागिरी:- पोलिस शिपाई-बॅण्ड्समनच्या ३ पदासाठी १ हजार ७०८ उमेदवारांनी  लेखी परीक्षा दिली. लेखी परीक्षा OMR पध्दतीने घेण्यात आली. सर्व उत्तरपत्रिका पोलिस बंदोबस्तात पोलिस मुख्यालात आणून स्वंतत्र बंदीस्त कक्षामध्ये पुर्णपणे बंदोबस्तात तपासणी प्रक्रिया पुर्ण केली. लेखी परीक्षेचे तात्पुरते गुणपत्रक ४ सप्टेंबरला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत.

उमेदवारांना काही आक्षेप, हरकत  असल्यास ३ दिवसांत नोंदविण्याचे आवाहन पोलिस दलाने केले. 
जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील ६६ पोलिस शिपाई रिक्त पदांसाठी २०१९ रोजी जाहिरात देण्यात आलेली होती. त्यातील फक्त ३ बॅण्डस्मन पदाकरीता ५००५ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. त्यांची ०३ सप्टेंबर २०२१ ला लेखी परीक्षा रत्नागिरी शहरातील विविध परीक्षा केंद्रावर झाली. भरती प्रक्रीया पारदर्शकपणे व निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली होती. यामुळे कोठेही गैरप्रकार झाल्याची नोंद नाही. उमेदवारांना परीक्षा केंद्राची माहितीसाठी व परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण येवू नये, याकरीता रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅण्ड, पोलिस मुख्यालय व शहरातील मुख्य ठिकाणी माहिती फलक तसेच लोकेशन लिंक सिस्टीम उपलब्ध करुन देण्यात होती. त्यामुळे कोणतीही गैरसोय झालेली नाही. भरतीसाठी पासवर्ड अपडेट केलेल्या ३ हजार ८५६ उमेदवारांपैकी १ हजार ७०८ उमेदवार लेखी परीक्षेसाठी उपस्थित होते. लेखी परीक्षा OMR पध्दतीने घेण्यात आली. लेखी परीक्षेचे तात्पुरते गुणपत्रक रत्नागिरी जिल्ह्याचे  www.ratnagiripolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्याबाबत उमेदवारांचे काही आक्षेप/हरकत असल्यास त्यांना ३ दिवसांत कार्यालयाचा व्हॉटस्अॅप नं.८८८८९०५०२२ किंवा ०२३५२-२७१२५७ या दुरध्वनीवर तसेच ई-मेल आयडी spratnagiri@mahapolice.gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.