रत्नागिरी:- रेल्वेच्या सुरत ते मंगलोर प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ५० हजारांच्या लॅपटॉपच्या चोरी प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रसाद जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. भेरसे, ता. अलिबाग, जि. रायगड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ६ एप्रिलला सकाळी साडेचार ते पाच या सुमारास उक्षी रेल्वस्टेशनदरम्यान घडली होती. फिर्यादी दिशा रणजित हे रेल्वेच्या सुरत ते मंगलोर गाडीतून प्रवास करत असताना चोरट्याने रत्नागिरी- उक्षी रेल्वेस्टेशनदरम्यान त्यांचा ५० हजारांचा लॅपटॉप पळविला. या प्रकरणी रणजित यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितास अटक केली.









