रत्नागिरी:- शहरातील लाला कॉम्प्लेक्स येथील एका कॅफेसमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने लांबवली. ही घटना मंगळवार 7 मार्च रोजी दुपारी 2.30 ते 6 वा.कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी सहान इस्माईल सय्यद (20,रा.गोळप सडा,रत्नागिरी) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,मंगळवारी दुपारी त्याने आपली जीक्सर दुचाकी (एमएच- 08-एएफ- 9464) लाला कॉम्प्लेक्स येथील इन्फीनीटी कॅफेसमोर पार्क केली होती.त्यानंतर तो त्याचा मित्र संजय पिलणकर सोबत श्री देव भैरी उत्सवासाठी जाउन पुन्हा लाला कॉम्प्लेक्स येेथे आला असता त्याला आपली दुचाकी दिसून आली नाही.त्याने आजुबाजुला गाडीचा शोध घेतला परंतू ती मिळून न आल्याने त्याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.









