Saturday, June 20, 2026
spot_img
Home लांजा लादी डोक्यात पडून तरुण जखमी

लादी डोक्यात पडून तरुण जखमी

रत्नागिरी:- वेरवली (ता. लांजा) येथे बिल्डींगचे काम करत असताना लादी डोक्यात पडून मध्यप्रदेश येथील तरुण जखमी झाला. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. राजू गांचू दुर्वे (वय २९, रा. राजापूर रेल्वेस्टेशन, मुळ ः मध्यप्रदेश) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास वेरवली येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू दुर्वे हा लांजा तालुक्यातील वेरवली येथे बिल्डींगचे काम करत असताना अचानक त्याच्या डोक्यावर लादी पडली. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.