रत्नागिरी:- शहरातील कोकणनगर येथे काही कारण नसताना लाकडी पट्टीने मारहाण करुन दुखापत केली. शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महमद शरीफ डोंगरकर, एक महिला (दोघेही रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे संशयित आहेत. ही घटना रविवारी (ता. २१) व सोमवारी (ता. २२) दुपारी दोनच्या सुमारास कोकणनगर येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रफिया दिलराज मोकाशी यांच्या नंदेचा नवरा संशयित डोंगरकर व नणंद रेश्मा शरीफ डोंगरकर यांनी काही कारण नसताना फिर्यादी यांच्या घराच्या खिडकीची काच लाकडी पट्टीने फोडली. ती पट्टी फिर्यादी मोकाशी यांच्या डोवर लागली. तसेच संशयित शरीफ याने फोडलेल्या खिडकीच्या काचेने मोकाशी यांच्या हाताच्या कोपरावर मारुन दुखापत केली. त्यानंतर सर्वजण घराच्या खाली आले असता संशयितांनी फिर्यादी यांना खाली पाडून लाकडी पट्टीने मारहाण केली. तर फिर्यादी महमद शरीफ अब्दुल डोंगरकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची पत्नी रेश्मा असे किर्तीनगर मजगाव रोड रत्नागिरी येथील घरी असताना फिर्यादीचा मेव्हणा दिलराज मोकाशी हा मद्य प्राशन करुन आला सोबत त्याची पत्नीही होती. दोघे बोलत असताना त्यांची बहिण ही फिर्यादी यांच्या रुममध्ये आली त्यावेळी तु खशाला खाली जावून बसतेस असे बोलून फिर्यादीचा मेव्हुणा संशयित दिलराज हा व त्याची पत्नी रेश्माला शिवीगाळ केली या प्रकरणी डोंगरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.