लांजा:– विनापरवाना गायीची वाहतूक करुन त्यांना शारीरिक आजार होईल अशा प्रकारे पिकअप गाडीमध्ये भरुन घेवून जाणारे तिघांना पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घटना बुधवारी रात्री हर्चे – बेनी फाटा येथे घडली आहे.
हर्चे येथील विठ्ठल धोंडू शिर्सेकर ( वय – ६६ ) यांच्या मालकीच्या गोठ्यातून अजय नारायण तरळ ( – ४३ ) व संदीप राजाराम जाधव ( – ३५ ) दोन्ही रा. साठवली गांगोवाडी यांनी शिर्सेकर यांच्याकडून चार गायी खरेदी करुन बुधवारी रात्री बोलेरो पिकप गाडी क्र .( एम . एच . ०८ ए . पी . ५६५४ ) मध्ये दाटीवाटीने भरुन हर्चे येथून रात्री विनापरवाना वाहतूक करीत असताना रात्री ११.३० वा . दरम्याने हर्चे – बेनी फाटा येथे आले असता स्थानिक ग्रामस्थ यांनी पकडून लांजा पोलिस यांना यांची कल्पना दिली . पोलिसांनी घटनास्थळी जावून गायी व बोलेरो पिकप तसेच तिघांना ताब्यात घेवून अभिषेक सुरेश तेंडुलकर रा . भडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . जवळपास चार गायीचे २२ हजार रुपये सुमारे किंमत असून ४ लाख रुपये पिकप गाडीची किंमत आहे .अधिक तपास हेडकॉन्स्टेबल तेजस मोरे हे करीत आहेत.