लांजा:– लांजा तालुक्यातील झापडे गावात वीज वाहक खांबावरून विद्युत जोडणीमध्ये फेरफार करून विजेची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाली राजू माळी, कनिष्ठ अभियंता महावितरण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार झापडे गावातील शांताराम भगवान इंदुलकर या संशयिताने १९ जानेवारी २०२३ च्या दरम्यान खांबावरून आलेल्या विद्युत जोडणीमध्ये फेरफार करून ६७२० युनिटची म्हणजेच १ लाख ४१ हजार ०८६ रुपयांची वीज चोरी केली असल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात विद्युत वितरण कंपनी मर्या. लांजा उपविभाग यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.