रत्नागिरी:- भाडे तत्वावर कोल्हापूर येथे रोड रोलर नेऊन परस्पर त्या वाहनाची विक्री करुन विश्वासघात करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुराद उर्फ पिंटू अल्लमसीर हवालदार (रा. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १५ सप्टेंबर २०२१ ते १६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत गणेश कॉलनी, नागले महाकाल संकुल नाचणे-रत्नागिरी येथे घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी यांच्या पतीच्या नावावर असलेला रोड रोलर (क्र. एमएच-०८ २२५४० बीएम) हा संशयिताने भाडे तत्तावर कोल्हापूर येथे नेला. त्याचे भाडे न देता रोड रोलर फिर्यादी यांच्या संमत्ती शिवाय दुसऱ्या व्यक्तीला विक्री करुन फिर्यादी यांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मुराद हवालदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.