रॉडने मारहाण करून हत्या; रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील घटना

रत्नागिरी:- बोट बाजूला केल्याचा राग मनात ठेवून बोट मॅनेजर पैगंबर साहेबलाल नदाफ (वय 42, रा. रत्नागिरी) यांना तांडेल शरणप्पा हंचालप्पा होसेगिरी याने लोखंडी रॉडने मारहाण केली होती. गँभीर जखमी झालेल्या नदाफ यांचा उपचारा दरम्याने कोल्हापूर येथे मृत्यू झाल्याने शहर पोलिसांनी शरणप्पा हंचालप्पा होसेगिरी याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

पैगंबर साहेबलाल नदाफ आपल्या दुर्गा प्रसाद बोटीच्या नालीला डिंगणीतुन कलर काम करीत असताना शेजारी असलेली भराडी प्रसाद बोटीचा त्रास असल्याने सायंकाळी 6.30 वा.चे दरम्यान त्या बोटीची पांग सैल करुन बोट मागे हटवली. भराडी प्रसाद बोटीवरील तांडेल आरोपी शरणप्पा हंचालप्पा होसेगिरी (वय 35 वर्षे, रा. निट्टाली , ता.येलबुर्गा, जि.कोप्पल राज्य कर्नाटक) याने याचा मनात राग धरुन पैगंबर नदाफ यांना शिवीगाळी करुन बोटीवरील लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करुन दुखापत केली होती. पैगंबर नदाफ यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.