रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेचा मोबाईल लांबवल्या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना सोमवार 28 जुलै रोजी दुपारी 2 ते 3.10 वा.सुमारास मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये घडली आहे.
राजश्री व्ही.पी.एम.श्रीधरण (35, रा. भुवनेश्वर, ओरीसा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 27 जूलै रोजी रात्री 10.30 वा.त्या कोजीकोडे रल्वेस्टेशन येथून पनवेल स्टेशनला येणारी मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होत्या.28 जुलै रोजी दुपारी त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनला आली असता त्या झोपलेल्या असल्याची संधी साधत अज्ञाताने त्यांचा सीटवरील 15 हजारांचा मोबाईल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.