रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची बॅग लांबवून अज्ञाताने तब्बल 4 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना रविवार 26 मे रोजी सकाळी 6.45 वा. सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर घडली होती.
याबाबत अन्नम्मा जोसेफ (56,सध्या रा.डोंबिवली मुळ रा.केरळ) यांनी पनवेल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर झिरो नंबरने हा गुन्हा सोमवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यानुसार, अन्नम्मा जोसेफ संपर्कक्रांती एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. रविवारी सकाळी त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर आली असता त्यांना आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. बॅगमधील सोन्याचे ब्रेसलेट, बांगड्या, पैंजण, नेकलेस, अंगठी, चेन, रोख 85 हजार रुपये, मोबाईल असा एकूण 9 लाख 93 हजार 250 रुपयांचा ऐवज अज्ञाताने लांबवला. याप्ररणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.