रेल्वे टीसी असल्याची बतावणी करत प्रवाशांकडून उकळले पैसे; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रेल्वेचा टीसी असल्याची बतावणी करत 7 प्रवाशांकडून प्रत्येकी 100 प्रमाणे 700 रुपये उकळणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 17 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 10.30 वा.कालावधीत सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स या रेल्वेत रत्नागिरी रेल्वेस्टेशन ते उक्षी रेल्वेस्टेशनमध्ये घडली.

अंकुश तुकाराम तेलवाडे (32,रा.जव्हार,पालघर) असे गुन्हा दाखल करण्या आलेल्या संशयिताचे नाव आहे.रविवारी रात्री तो सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वेतून प्रवास करत होता.या रेल्वेमधील एस-5 बोगीमधून जनरलचे तिकिट घेउन प्रवास करणार्‍या लोकांना त्याने आपण रेल्वेचा टिटी असल्योच खोटे सांगून 7 जणांकडून प्रत्येकी 100 प्रमाणे 700 रुपये घेतले.याप्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 419 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.