रेल्वे कॉलनी येथे पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

रत्नागिरी:- रेल्वे कॉलनीच्या भीमा बिल्डींग येथील मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ९) सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आसी उस्मान पिरनाईक (वय२१, रा.कालसेकर चाळ, कुंभारवाडी स्टॉप, ता. लांजा) यांनी दुचाकी (क्र एमएच-०८ यु ५८४२) ही भिमी बिल्डींग येथील मोकळ्या जागेत पार्क केली होती. चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी पिरनाईक यांना शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.