रत्नागिरी:- रेल्वेप्रवासादरम्यान तरुणाची बॅग लांबवून अज्ञाताने तब्बल 2 लाख रुपयांचा मुददेमाल लांबवला. चोरीची ही घटना 9 मे 2023 रोजी रात्री 11 ते 10 मे रोजी सकाळी 5 वा.कालावधीत रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे घडली.
याबाबत अनमोल आरके तिवडेवाड (31) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,9 मे रोजी ते राजधानी सुपरफास्ट एक्सप्रेसने प्रवास करत होते.प्रवासादरम्यान ते झोपी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांची बॅग लांबवून रोख 50 हजार रुपये आणि 1 लाख 50 हजार रुपयांचा हिर्यांचा हार असा एकूण 2 लाख रुपयांचा ऐवज लांबवला.याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.