रेल्वेमधील प्रवाशाचा मोबाईल रत्नागिरी स्थानकावर लांबवला

रत्नागिरी:- एर्नाकुलम एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाई रत्नागिरी रेल्वेस्टेशनदरम्यान चोरट्याने लांबवला. या प्रकरणी शहर पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २१ जानेवारी २०२३ या कालावधीत पहाटे पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवासी एर्नाकुलम एक्स्प्रेसच्या कोच सीट नं. ७१ वर वापी रेल्वेस्टेशन ते रत्नागिरी असा प्रवास करत असताना चोरट्याने त्यांचा ५ हजाराचा मोबाईल पळवला. या प्रकरणी प्रवाशाने शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.