खेड:- खेड रेल्वेस्थानकादरम्यान एका प्रवाशाचा चार्जिंगला लावलेला 31 हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद सत्या दास आय बी (59, केरळ) यांनी खेड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्या दास आय बी हे कुटुंबासह निजामुद्दीन एक्स्प्रेसने त्रिवेंद्रमला जात होते. यावेळी रेल्वेत त्यांनी आपला मोबाईल चार्जिंगसाठी लावला आणि ते झोपी गेले. खेड रेल्वे स्थानका दरम्यान त्यांना जाग आली. यावेळी त्यांनी पाहिले असता 31 हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेला होता. त्यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









