खेड:- येथील रेल्वे स्थानकात मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी दिवा रेल्वे मध्ये आत मध्ये शिरत असताना एका अज्ञात चोरटयाने ७५ हजार रुपये किंमतीची बांगडी चोरल्या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा च्या सुमारास घडला दापोली येथील ५५ वर्षीय महिला गाडी मध्ये आत शिरत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा उचलून महिलेची हातातील दिड तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरून नेली.