रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेत विनापरवाना खाद्यपदार्थ विकणाऱ्या सात जणांना न्यायालयाने १ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिना कारावास असे शिक्षेचे स्वरुप आहे.

गुलाबसिंह रामानंद, विकास सिंह, सतेंद्र सिंह, आशिष ब्रज किशोर, मेराज शाह, भारत सिंह व राजेश सिंह अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संशयित हे कोकण रेल्वे मार्गावरील गाडीमध्ये विनापरवाना खाद्यपदार्थ विकत असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्यानुसार त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. तसेच न्यायालयापुढे त्यांना हजर करण्यात आले होते. भारतीय रेल्वे कायदा कलम १४४ (१) नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायालयाने हा शिक्षेचा निकाल दिला. न्यायालयापुढे आरोपी यांनी आपला गुन्हा कबुल केल्याने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कमल २५२ नुसार व आरोपीनी स्वच्छेने दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीनुसार दिली. न्यायालयाने १ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.