रेल्वेतून बांगड्या लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

खेड:- खेड रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वेत चढत असताना वुध्देच्या हातातील सोन्याची तब्बल 1 लाख 45 हजारांचा बांगडी लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरीची ही घटना 11 सप्टेंबर रोजी घडली होती.

अभिजीत जितू पवार ( 27, रा, रूम नं. 516, हनमान मंदीर रोड, हनुमान मंदीरच्या मागे, सुभाषवाडी, अंबरनाथ (प), जि. ठाण) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यानेच हा गुन्हा त्याचा मित्र निलेश गायकवाड,( रा भवानी चौक, अंबरनाथ) यांचेसह संगनमताने केला असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचे कडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली 14 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे याबाबत फिर्यादी रंजना वामन पालंडे, ( 69 वर्षे, राह. दहिसर, मुंबई ) यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार, त्या ह्या दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 3.20 वा सुमारास खेड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्र. 1 वर आलेल्या गाडी नं. 10106 सावतंवाडी दिवा एक्सप्रेस गाडीच्या कोच नं. डी-3 मध्ये गर्दीत चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी त्यांचे नकळत चोरून नेली होती. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई नेरूळ युनिटचे अधिकारी अंमलदार हे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे व बातमीदार यांचे मदतीने तपास करत होते त्यावेळी दि. 12 ऑक्टोबर रोजी सदरचा गुन्हा केलेला संशयित अभिजीत पवार हा पनवेल रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पनवेल रेल्वे स्टेशनमधून अभिजीत पवारला ताब्यात घेतले. ही कामगिरी एम. राकेश कलासागर, पोलीस आयुक्त. लोहमार्ग मुंबई, सुनिता ठाकरे -साळुंके, पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई (अतिरिक्त कार्यभार, पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई) आणि प्रज्ञा जेडगे, पोलीस उप-आयुक्त, मध्य-परीमंडळ, लोहमार्ग मुंबई, श्री. राजेंद्र रानमळे, सपोआ. गुन्हे, लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली व श्री. विजय खेडकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई वरिष्ठ पोलिस निरीक्षक, प्रदिप पाडवी (रत्नागिरी रे. पो. ठाणे) यांच्या सुचना प्रमाणे पोलीस उप-निरिक्षक सुनिल लोणकर, श्रेणी पो.उप.निरीक्षक सुधाकर सावंत, पोलीस हवालदार विकास नलगे, सुनिल खोत, जनार्दन पुलेकर, रणजित रासकर, अतुल धायडे, सुरेश एल्ला, इम्रान शेख, प्रशांत रेडकर, सुनिल मागाडे, पोलीस शिपाई स्वप्निल नागरे (सर्व गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई), पोहवा. मंगेश खाडे (रत्नागिरी रे.पो. ठाणे) यांनी केली आहे.