रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या सामानावर चोरट्याचा डल्ला

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या दिवा पॅसेन्जरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने १ लाख ५०० रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) सकाळी सव्वा सहा ते सातच्या सुमारास रत्नागिरी ते उक्षी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.

पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरज कमलाकर भोसले (वय ३०, रा. नेरळ, भोपले, कर्जत, रायगड. मुळ ः गावखडी, भंडारवाडी, रत्नागिरी) हे गुरुवारी दिवा पॅसेन्जर ट्रेन मधून रत्नागिरीकडे येत असताना उक्षी ते रत्नागिरी दरम्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्याकडील सामान चोरले. त्यामध्ये स्टीलच्या डब्यात १ लाख रुपये व ५०० रुपयांची पर्स पळविली. या प्रकरणी सूरज भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.