रत्नागिरी:- कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या बिहार येथील महिलेची बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. यात महिलेचा सुमारे ६५ हजार ५०० रुपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. शहर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली असून चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्मिता अनिलकुमार चौबे (रा. बिहार) यांनी याची तक्रार दाखल केली आहे. चौबे या पती व मुलांसह एलटीटी एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेसमधून कुर्ला-मुंबई ते मडगाव जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करत होत्या. त्यांनी आपली बॅग डोक्याजवळ घेऊन झोपल्या होत्या. तसेच त्यांचे पतीही झोपले होते. स्मिता चौबे या झोपलेल्या असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची बॅग लांबवली. त्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. अज्ञात चोरट्याने लांबवलेल्या बॅगमध्ये ३० हजार किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, २० हजार मेक टायटन राग कंपनीचे घड्याळ, ८ हजाराचे मेक फिटविट कंपनीचे एक स्मार्ट घडचाळ, २ हजार ५०० फास्टट्रॅकचा एक सनग्लास, ३ हजाराची रोकड, ३ हजाराचे ब्लू टुथ इअरबड्सची एक जोड़ी, इतर कागदपत्रे असा एकूण ६५ हजार ५००चे ऐवज लांबवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.









