रत्नागिरी:- रेल्वेच्या सुरत ते मॅगलोर प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा ५० हजाराच्या लॅपटॉपच्या चोरी प्रकरणातील संशयिताना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रसाद जगन्नाथ पाटील (वय ३०, रा. भेरसे, ता. अलिबाग, जि. रायगड) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना ६ एप्रिलला सकाळी साडेचार ते पाच या सुमारास उक्षी रेल्वस्टेशन दरम्यान घडली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी दिशा रणजित (रा. कल्लाजल हाऊस, बेतवाल टी कोडमन, राज्य कर्नाटक) हे रेल्वेच्या सुरत ते मॅंगलोर गाडीतून प्रवास करत असताना चोरट्याने रत्नागिरी-उक्षी रेल्वेस्टेशन दरम्यान त्यांचा ५० हजाराचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने पळविला. या प्रकरणी रणजित यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.