रत्नागिरी:- दोन दिवस दिलासा मिळाल्यानंतर मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मिठी वाढ झाली. मंगळवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 24 तासात 269 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात एका तर यापूर्वीच्या दोन अशा तीन मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 195 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79 हजार 385 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.45 टक्के आहे. नव्याने 269 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 171 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 505 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 911 तर संस्थात्मक विलगीकरणात 328 रुग्ण उपचार घेत आहेत.