रत्नागिरी:- तोंडी करारावर रिसॉर्ट चालविण्यास देणाऱ्या फिर्यादी महिलेला तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुकुंद माधव चाफेकर (वय ७०) व सौ. आरती मुकुंद चाफेकर (वय ६५, रा. रोहन लेहरबाणेर, पुणे) अशी संशयिताची नावे आहेत. ही घटना १ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत तालुक्यातील नांदिवडे येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला यांनी आपल्या मालकीचे रिसॉर्ट संशयित मुकुंद चाफेकर व त्यांची पत्नी सौ आरती यांना तोंडी करारावर चालविण्यास दिले होते. यातील संशयित मुकुंद व सौ. आरती यांनी फिर्यादी यांचा मुलगा व पती यांना खोटेपणाने व अप्रमाणीकपणे वेगवेगळी प्रलोभने अमिषे दाखवून फिर्यादी महिला त्यांच्या बंगल्याचा वरील मजला वापरण्याची व रिसॉर्ट चालविणे आणि नारळाचे उत्पन्न घेण्यास परवानगी देण्यास भाग पाडून फिर्यादी यांचे पती व मुलगा यांचा विश्वासघात करुन दोन्ही संशयितांनी २८ एप्रिल २०२५ ला सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास त्या अंगणात उभ्या असताना संशयित मुकुंद चाफेकर यांनी फिर्यादी महिला यांना अश्लील बोलून, हातवारे करुन, अश्लील हावभाव करुन त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकरणी फिर्यादी महिलेने जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.









