रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील रिळ येथील शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांना राज्य शासनाचा 2018 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला. गेल्या काही वर्षात शेती क्षेत्रात वैविध्यपुर्ण कामगिरी केली आहे. त्यापुर्वी त्यांनी राज्यस्तरीय भातपिक स्पर्धेतही प्रथम क्रमांक पटकावला होता.
मिलिंद वैद्य यांनी प्रामुख्याने भातशेतीत संशोधन करून चांगले उत्पादन घेतले आह़े दरवर्षी अधिक उत्पादन देणार्या सुधारित व संकरित जातींची निवड करून संतुलित पद्धतीने सेंद्रीय आणि रासायनिक खतांचा वापर करून पीक व्यवस्थापनावर त्यांनी भर दिला होत़ा. कोकणातील शेतकार्यांना चांगल्या दर्जाचे भातपीक उपलब्ध व्हावे यासाठी ते प्रयत्न करत आले आहेत. रत्नागिरीतील भात संशोधन केंद्राने तयार केलेल्या रत्नागिरी 8 या भात बियाण्याची निर्मिती करुन ते पुन्हा केंद्राला दिले आहे. सुमारे 1300 किलो भाताचे उत्पादन घेतले आहे. 2018 साली त्यांनी गुंठ्याला 192 किलो भाताचे उत्पादन घेतले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेवून त्याना राज्यशासनाचा राज्यस्तरीय शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आह़े