राधाकृष्ण नगर येथे बॅगेतील ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- शहरातील ए-लतिफ बिल्डींग, राधाकृष्ण नगर नाष्टा करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या रुम मधून चोरट्याने बॅग मधील रोख रक्कमेसह दोन मोबाईल असा ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १३) सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास ए-लतिफ बिल्डींग, दुर्गा मातेजवळ, राधाकृष्ण नगर, रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी जितेंद्र संजय पाटील (वय २४, रा. ए-लतिफ बिल्डींग, राधाकृष्णनगर, रत्नागिरी) हे सकाळी राधाकृष्णनगर येथे भाड्याने रहातात सकाळी ते नाश्ता करण्यासाठी बाहेर गेले होते. त्या अवधित चोरट्याने त्यांच्या रुमचा दरवाजाला असलेले कुलुप तोडून रुममध्ये प्रवेश केला. रुममध्ये बॅग मध्ये ठेवलेले दोन मोबाईल व रोख रक्कम दीड हजार असात ३१ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी जितेंद्र पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.