रत्नागिरी:- रत्नागिरीतील वातानुकूलित मेडिकल कॉलेज हे राज्यातील पहिले वातानुकूलित आहे, या मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर असताना विकासात्मक कामांचा आढावा घेतला, यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेज विषयी माहिती दिली, राज्यातील वातानुकूलित असणार रत्नागिरीतील मेडिकल कॉलेज हे पहिले आहे, सर्व सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून अत्याधुनिक यंत्रणा असलेले हे मेडिकल कॉलेज सर्वांसाठी उल्लेखनीय बाब आहे. त्यामुळे गेले अनेक वर्षे रखडलेल्या मेडिकल कॉलेजचा प्रश्न मार्गी लागला आहे.
विशेष म्हणजे या मेडिकल कॉलेजची प्रवेश १०० टक्के पूर्ण देखील झाली त्यामुळे लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. त्यांनंतर त्यांनी उद्यमनगर येथील मेडिकल कॉलेजची पाहणी केली, काम अंतिम टप्प्यात असून सर्व काम सुरळीत सुरू आहे की नाही याची शहानिशा त्यांनी यावेळी केली