राजीवडा येथे किरकोळ कारणातून सावत्र भावाला मारहाण

रत्नागिरी:- किरकोळ कारणातून सावत्र भावाला गाडीच्या चावीने मारहाण केल्याप्रकरणी तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना सोमवार 14 ऑगस्ट रोजी रात्री 8.15 वा.राजीवडा पुलाखाली घडली.

अरबाज इक्बाल म्हसकर (रा.राजीवडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.त्याच्या विरोधात त्याचा सावत्र भाउ कैफ इक्बाल म्हसकर याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,सोमवारी रात्री कैफ हा समुद्रातून मासे पकडून घराच्या मागील बाजुस असलेल्या लाकडी बाकावर बसला होता.त्यावेळी अरबाजने त्याठिकाणी जाउन तू इथे आमच्या घराजवळ बसायचे नाही असे बोलला.त्यामुळे कैफ तिथून राजीवडा पुलाखाली जाउन उभा राहिला असता अरबाजने त्याठिकाणी जाउन हातातील गाडीच्या चावीने कैफच्या उजव्या खांद्यावर मारुन दुखापत केली.याप्रकरणी अरबाज विरोधात भादंवि कायदा कलम 324,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.