रहाटाघरजवळ प्रौढाला मारहाण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील रहाटाघरजवळ अज्ञात कारणातून प्रौढाला बुधवारी दुपारी त्याच्या शेजार्‍याने हातांच्या थापटांनी तसेच काठीने मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिपीन विजय पिलणकर (36) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात कृष्णकांत दत्ताराम वर्तक (51, रा.रहाटाघर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवार 17 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास कृष्णकांत वर्तक नेहमीप्रमाणे घरातील अन्न डब्यामध्ये घेउन परिसरातील कृत्र्यांना खायला घालण्यासाठी आपल्या रुममध्ाून बाहेर पडले. त्यावेळी बिपीन शेजारील रुममधून बाहेर आला आणि त्याने कृष्णकांत वर्तक यांना हातांनी मारहाण केली. त्यानंतर वर्तक हे तळमजल्यावरील जिन्यावर आले असता बिपिनने काठीने त्यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली.