रत्नागिरी:- महावितरण कंपनीच्या थकबाकीचा बोजा काहीसा कमी झाला असला तरी तो अजून आहेच. रत्नागिरी जिल्ह्यातील ५३ हजार ७११ ग्राहकांकडून १८ कोटी ३५ लाखाची थकबाकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४७ हजार ७४० ग्राहकांकडून २४ कोटी ९८ लाख अशी दोन्ही जिल्ह्यांची थकबाकी ४३ कोटी ३३ लाख रुपये एवढी आहे.
महावितरण कंपनीने ग्राहकांना संधी देऊनही पाहिले तरी अनेक ग्राहकांकडून त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे कंपनीने कठोर पावले उचलत अनेक थकबाकीदारांची वीज जोडणी तोडण्याची कारवाई सुरू कोली. कारवाईमुळे काही प्रमाणात वसुली होऊ लागली. मार्च अखेर झाला तरी अजूनही रत्नागिरी जिल्ह्याची थकबाकी १८ कोटीच्यावर आहे. यामध्ये ३९ हजार ९५१ घरगुती ग्राहकांकडे ३ कोटी, वाणिज्य ३ हजार ९७८ ग्राहकांकडे १३ लाख, ३५८ औद्योगिक ग्राहकांकडे ३४ लाख, ४ हजार ३२९ शेती ग्राहकांकडून ९१ लाख, अन्य शेतकऱ्यांकडून ६६ लाख, १ हजार ५७९ पथदिवेकडून ९ कोटी ५७ लाख, ७३८ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे १ कोटी ७७ लाख, १ हजार ८४६ सार्वजनिक सेवाकडून ९५ लाख असे एकूण ५३ हजार ७११ वीज ग्राहकांकडून १८ कोटी ३५ लाख रुपये थकित आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ हजार ४२८ ग्राहकांकडे १ कोटी ८७ लाख थकित आहेत. २ हजार ४२८ वाणिज्य ग्राहकांकडून ५८ लाख, २७० औद्योगिक ग्राहकांकडे ३८ लाख, ११ हजार ८८२ शेती ग्राहकांकडून ३ कोटी १ लाख २ हजार ४१९, पथदिव्यांचे १५ कोटी ८६ लाख, ८०८ सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे २ कोटी ६४ लाख, १ हजार ३४९ सार्वजनिक सेवांचे ६७ लाख असे एकूण ४७ हजार ७१४ ग्राहकांकडून २४ कोटी ९८ लाख रुपये थकित आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील ४३ कोटी ३३ लाख एवढ्या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी कामाला लागले आहेत.