रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; पाच जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप, प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रवण उदयभान गौडवय (वय २२, रा. पुष्पेंद्रनगर, साळवी स्टॉप, रत्नागिरी), हर्षवर्धन सुहास वाटवे (वय ३४, रा. बंदररोड-मांडवी रत्नागिरी), वसीम अब्दूल रहामान तांडेल (वय ४०, रा. राजीवडा, मच्छीमार्केट, रत्नागिरी), इरशाद आदम कोतवडेकर (वय ४१, रा. राजीवडा-मच्छीमार्केट, रत्नागिरी), मतीन बशीर वस्ता (वय ४३, राजिवडा-मच्छीमार्केट, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना रविवारी (ता. १३) सायंकाळी साडेसहा ते पावणे नऊच्या सुमारास शहरातील साळवी स्टॉप ते प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांकडे मद्य परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना आढळले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शरद जाधव, सहायक पोलिस फौजदार अजय मोहिते यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.