रत्नागिरी:- शहरातील झाडगाव व साळवीस्टॉप जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष उर्फ चिम्या दामोदर साबळे (वय ४८) व शक्ती विनायक साळुंखे (वय २९) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. २३) दुपारी अडीच ते रात्री साडेआठ च्या सुमारास झाडगाव व साळवी स्टॉप येथील सार्वजनिक ठिकाणी निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल अनुप पाटील व पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.