रत्नागिरी:- शहरातील आझाद कॉलनी येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून अज्ञाताने दुचाकी लांबवली. ही घटना 4 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 5 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. कालावधीत घडली आहे.
याबाबत अमान नौशाद शेकासन (22, रा.राहत अपार्टमेंट आझाद कॉलनी, रत्नागिरी ) याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार,बुधवार 4 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. त्याने आपली दुचाकी (एमएच-05-डीएक्स-5980) अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गाडी घेण्यासाठी पार्किंगमद्ये गेला असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्याने आजूबाजूला दुचाकीचा शोध घेतला असता दुचाकी मिळून आली नाही. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात येताच अमानने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.









