रत्नागिरी विमानतळावर नाईट लँडिंगची चाचणी

रात्री लँडिंग- टेकऑफ; रत्नागिरीकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांची विमानतळाचे अनेक वर्षापासूनचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. रत्नागिरी विमानतळावर नाईट लँडिंगच्यादृष्टीने तटरक्षक दलाकडून चाचणी सुरू झाली आहे. आज विमान रात्री उशिरा लँडिंग आणि टेकऑफ झाले. त्यामुळे लवकरच रत्नागिरी विमानतळ सेवेत दाखल होण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे.

ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित उतरावे यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ‘व्हॉलिंन्टीर रॅपिड डिझास्टर मॉनेटरिंग अ‍ॅण्ड मॅपिंग’ व्हीओआरडीएम ही यंत्रणा रत्नागिरी विमानतळावर बसवली आहे. त्यासाठी काही दिवसातच न्यूझीलँड येथून तंत्रज्ञ आले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे याठिकाणी सद्यपरिस्थितीत इर्मजन्सीच्यावेळी नाईटलॅण्डींगही होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर वैमानिक धोका टाळण्यासाठी नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळांवर सुरक्षित विमाने उतरवित असतो. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते. अशा वेळी विमान उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी विमानतळावर ‘व्हॉलिंन्टीर रॅपिड डिझास्टर मॉनेटरिंग अ‍ॅण्ड मॅपिंग’ व्हीओआरडीएम ही यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरविता येणार आहे. ही एक अत्याधुनिक यंत्रणा असून ती रत्नागिरीत दाखल झाली असून ती बसवण्यासाठी न्यूझीलँड येथील तंत्रण्यान वापरले आहे.

या विमानतळासाठी नुकतीच 27 हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले असून आणखी 17 एकर जागा ताब्यात घेतली . रत्नागिरी येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणारी टर्मिनल बिल्डींगचे काम डिसेंबरपासून सुरु झाले आहे. मुंबई विमानतळ प्राधिकरणाने याची तयारी पूर्ण केली आहे. प्रवासी टॅक्सी वाहतुकीसाठी आवश्यक मार्गिकेचे कामही जवळजवळ पूर्ण होत आले आहे. याठिकाणी सद्यस्थिती इर्मजन्सीला नाईट लँण्डींग होऊ शकते असे कोस्टगार्डच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी विमानतळावर नाईट लँडिंग ची चाचणी सुरू झाली आहे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.