रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून मोबाईल चोरी

रत्नागिरी:- गांधीधाम-हापा हमसफर एक्सप्रेस गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबली असताना एका प्रवाशाचा २७ हजार ९९९ रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना ११ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता घडली. मात्र, याबाबतची तक्रार ५ मे रोजी रात्री २२.२५ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिझवाना बान अल्ताफ (वय ४२, रा. सुरत, गुजरात) या गांधीधाम-हापा हमसफर एक्सप्रेस मधून प्रवास करत होत्या. ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर थांबली असताना, सीटवर ठेवलेला मोबाईल अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत तो मोबाईल चोरून नेला.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.