रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकानजिक असलेल्या कोकण प्लाझा समोर ब्राऊन हिरोईन या अंमली पदार्थासह गांजा विक्री करणार्या साहिल हनिफ मेमन (वय २५, रा. झारणीरोड बाजारपेठ) याला शहर पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमार ६१ हजार ४४० रु.चे ब्रऊन हिरोईन व १० हजार रु.चा गांजा असा ७१ हजार ४४० रु.चे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर साहिल मेमन याला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत.
पोलीस निरिक्षक विनित चौधरी यांनी अंमली पदार्थ विक्री करणार्यांविरोधात कडक कारवाईचे धोरण स्विकारले आहे. शहर अंमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यानुसार त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणार्या टोळीचा शोध घेवून कडक कारवाई करण्याच्या सुचना अंमलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार शहर पोलीसांचे गस्ती पथक पोलीस स्थानकाच्या हद्दीत तपासणी करत असताना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात साहिल मेमन आपल्या दुचाकीला लावलेल्या पिशवीत सुमारे ११ ग्रॅम वजनाचे ६१ हजार ४४० रु. किमंतीचे ब्राऊन हिरोईन व ५१० ग्राम वजनाचा गांजा घेवून विक्रीसाठी थांबला होता. त्याला पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेवून अटक केली. त्याच्याकडील ७१ हजार ४४० रु.चे अंमली पदार्थ पोलीसांनी जप्त केले आहे.
साहिल मेमन यांच्या विरोधात एनडीपीएस कलम ८ (क) २० (ब) नुसार गुन्हा दाखल करुन शुक्रवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने केले आहेत.अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक आकाश साळुंखे करीत आहेत.









