रत्नागिरी:- शहरातील मारूती मंदीर येथे अवैध जुगार चालवणाऱ्या तरुणावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिद्धेश हेमंत नेरकर (27, ऱा परटवणे रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े. त्याच्याकडून पोलिसांनी अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम हस्तगत केल़ी. ही कारवाई शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
मारूती मंदीर येथे अवैधरित्या जुगार चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार पोलिसांनी 14 जानेवारी रोजी सायंकाळी धाड टाकली. यावेळी सिद्धेश नेरकर हा अवैधरित्या जुगार चालवित होत़ा. त्याला ताब्यात घेण्यात आले.