रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या सायबर पोलीस स्थानक शाखेतर्फे मागील दोन महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यातून हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल्स (भ्रमणध्वनी) शोधून काढण्यात आले आहेत. यापैकी १७ मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
या शोध प्रक्रियेत रत्नागिरी पोलीसाांनी एकूण ३७ मोबाईल हँडसेट प्राप्त केले. २८ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती.जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी श्री. सदाशिव वाघमारे, कार्यालय अधीक्षक, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी याांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेले ३७ मोबाईल हँडसेट (भ्रमण ध्वनी) पैकी उपस्थित १७ मुळ मालकांना मोबाईल परत करण्यात आले.