रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकारीपदी वैभव गारवे 

रत्नागिरी:- रत्नागिरी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी कर्जत पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी आज पदभार घेतल्याने बाबर कार्यमुक्त झाले.

तुषार बाबर यांनी चार वर्षे पालिकेचा कारभार सांभाळला. त्यांच्या कारकिर्दीमध्ये तारांगण, शिवसृष्टी, थ्रीडी मल्टिमिडिया शो, काँक्रिटचे रस्ते, पाणीयोजना अशी अनेक चांगली कामे झाली. रत्नागिरीकरांनी मला भरभरून प्रेम दिले, सहकार्य केल्याबद्दल त्यांना मी धन्यवद देतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.