रत्नागिरी:- तालुक्यातील कोळंबे-ओझरवाडी ते निरुळ ठिकवाडी आणि पावस ते सापूचेतळे जाणाऱ्या रत्यावरील निरुळ येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 8 जुलै रोजी रात्री 7.50 ते 9 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
अशोक प्रभाकर नागवेकर (54,रा.कोळंबे ओझरवाडी,रत्नागिरी) आणि विशाल वसंत वारिशे (24,रा.गोळप धोपटवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात पोलिस हवालदार सुदेश शिंदे आणि पोलिस हवालदार वैभव कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन्ही संशयित हे सार्वजनिक ठिकाणी आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना मद्यप्राशन करत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









