रत्नागिरी धनजीनाका येथील पान टपरीतून ४५ हजारांचा गुटखा जप्त

रत्नागिरी:- शहरातील धनजीनाका येथे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या दुकादारावर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. महेंद्र शशिकांत पवार (42, ऱा जोशी पाळंद रत्नागिरी) असे या दुकानदाराचे नावे आह़े. त्याच्याकडून 45 हजार रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल़ा. शहर पोलिसांत महेंद्र पवार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील धनजीनाका येथे अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होत़ी. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी अन्न व औषध पशासनाकडून दुकानात छापा टाकण्यात आला. यावेळी संशयित आरोपी याच्या ताब्यात 45 हजार रूपयांचा गुटखा असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आढळून आल़े.  सर्व मुद्देमाल विभागाकडून जप्त करण्यात आल़ा. महेंद्र पवार याच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात भादंवि कलम 328, 188 व 272 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र पवार याला अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े. यावेळी न्यायालयाने पवार याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल़ी.