रत्नागिरी:- शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर हनुमान मंदिर येथे विक्रेत्याकडून हप्ता मागितल्याच्या वादातून फळविक्रेत्याने प्रौढावर वार केल्याची घटना घडली. राजाराम गोपिनाथ सावंत (65, ऱा झारणीरोड, रामआळी रत्नागिरी) असे जखमीचे नावे आह़े.
राजाराम यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल़े आहे. दरम्यान कलिंगड विक्रेत्याने आपल्याकडे हप्ता मागितला जात असल्याचा आरोप केला असून त्यासंबंधीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजाराम सावंत यांची जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावरील हनुमान मंदिर येथे टपरी आह़े. याठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने याठिकाणी असलेले खोके व फळविक्रेत्यांची जागा हलविण्यास सांगण्यात आली होत़ी. या कारणावरून राजाराम सावंत व फळविकेता यांच्यात जोरदार वाद झाला होत़ा. बुधवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा या राजाराम सावंत व कलिंगड विक्रेता यांच्यात वाद उफाळून आल़ा.
वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये होवून कलिंगड विक्रेत्याने कोणत्यातरी वस्तूने राजाराम यांच्या डोक्यात वार केल़ा. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या राजाराम यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आल़े. दरम्यान कलिंगड विक्रेत्याने आपल्याकडे हप्ता मागितला जात असल्याचा आरोप केला आह़े. समाज माध्यमांवर यासंबंधीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल़ा. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े तसेच उपविभागिय पोलीस अधिकारी देखील घटनेच्या ठिकाणी दाखल होत माहिती घेतल़ी.
याप्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात करण्यात येत होत़ी.