रत्नागिरी:- तालुक्यातील गावडे-आंबेरे तिवरेकरवाडी येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्यावर पूर्णगड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. प्रदीप प्रकाश शिवणेकर (३१, रा. गावडे- आंबेरे तिवरेकरवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यात ५ लिटर गावठी दारू आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावडे- आंबेरे तिवरेकरवाडी येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार ११ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पूर्णगड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. यावेळी संशयित आरोपी याच्या ताब्यात अवैध गावठी दारू पोलिसांना आढळून आली. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यातील वैदही गुरव यांनी तक्रार दाखल केली.