रत्नागिरी:- शहरातील एसटी स्टँड येथे एसटीमध्ये चढत असताना अज्ञाताने महिलेची पर्स लांबवून तब्बल 49 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.ही घटना सोमवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वा.घडली.
याबाबत महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,सोमवारी सकाळी ही महिला गांगर आयनेशन दुकानाबाहेरील एसटीस्टॉपवर एका एसटीमध्ये चढत होत्या.त्यावेळी ती संधी साधत अज्ञाताने महिलेच्या कापडी पिशवीत ठेवलेली पर्स काढून घेतली.पर्समध्ये सोन्याची 7 ग्रॅम वजनाची बांगडी,रेडमी कंपनीचा मोबाईल,रोख 24 हजार 350 रुपये असा एकूण 48 हजार 850 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.