रत्नागिरी:- शहरातील आठवडा बाजार झोपडपट्टी येथून 35 हजार रुपयांचा टाटा झिप टेम्पो अज्ञाताने चोरून नेला. ही घटना 6 डिसेंबर रोजी रात्री 11 ते 7 डिसेंबर रोजी सकाळी 6 वा. कालावधीत घडली आहे.याबाबत केरू आनंदा गोसावी (42 ,रा.आठवडा बाजार झोपडपट्टी, रत्नागिरी ) याने शनिवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार,6 डिसेंबरला रात्री त्याने आपला टेम्पो (एमएच- 50- एन-0443) झोपडपट्टीच्या बाहेरील रस्त्यावर चावी लावून पार्क केलेला होता.7 डिसेंबरला सकाळी केरू रस्त्यावर आला असता त्याला आपला टेम्पो कुठे दिसून आला नाही. त्याने काही दिवस शहरात टेम्पोचा शोध घेऊन अखेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.